ग्रामपंचायत खरीड (Kharid) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर पंचायत समिती अंतर्गत येणारी एक प्रगतिशील ग्रामपंचायत आहे. शेतीप्रधान व नैसर्गिक वातावरणाने नटलेले हे गाव सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम असून ग्रामपंचायत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
गावाची एकूण लोकसंख्या १०२२ असून त्यामध्ये ५१९ पुरुष व ५०३ महिला आहेत. एकूण घरे २६५ असून साक्षरता दर ९८% इतका उच्च आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ४९४.६५ हेक्टर आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे.
ग्रामपंचायत खरीड ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायतीचे प्रशासन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून चालविले जाते. ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण व सामाजिक उपक्रमांमध्ये ग्रामपंचायत सक्रिय भूमिका बजावते.
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत खरीड
मु. पो. खरीड,
ता. शहापूर, जि. ठाणे – 421403
📧 ई-मेल: gpkharid004@gmail.com
🌐 फेसबुक पेज:
https://www.facebook.com/profile.php?id=61579887261218
सरपंच:
सौ. वनिता शंकर पवार
📞 मोबाईल: 9356415385
उपसरपंच:
श्री. भालचंद्र मुकुंद गगे
📞 मोबाईल: 9373232994
ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. दिनेश रघुनाथ विशे
📞 मोबाईल: 7350678452
ग्रामपंचायत खरीडमध्ये एकूण ७ सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे —
१. श्री. सुनिल शंकर पवार
२. श्री. लडकू कोंडू वाघ
३. सौ. ललिता संजय गगे
४. सौ. कुसुम मालू पवार
५. सौ. गीराबाई चंदर पवार
६. सौ. पुष्पा सीताराम गगे
• जिल्हा परिषद केंद्र शाळा खरीड
UDISE No: 27211209001
मुख्याध्यापिका: सौ. सुनिता शेषराव सोनावणे
📞 संपर्क: 9921579198
• अंगणवाडी केंद्र खरीड
सेविका: सौ. मेघा मनोहर गगे
📞 संपर्क: 9372797559
ग्रामपंचायत खरीड हद्दीत खालील सर्व मूलभूत व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत —
• ग्रामपंचायत भवन
• शाळा व अंगणवाडी
• पशु वैद्यकीय दवाखाना
• इंटरनेट सुविधा
• सीसीटीव्ही व्यवस्था
• डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र)
• व्यायामशाळा
• तलाव / गाव तलाव
• माध्यमिक विद्यालय
ग्रामपंचायत खरीडमध्ये खालील शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत —
• स्वच्छ भारत अभियान
• प्रधानमंत्री आवास योजना
• आदिम घरकुल योजना
• मोदी आवास योजना
ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹ ६८,५०२/- असून तो पुढील बाबींवर खर्च केला जातो —
प्रशासकीय खर्च, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, ५% दिव्यांग कल्याण, १०% महिला व बालकल्याण, १५% मागासवर्गीय कल्याण, रस्ते, गटारे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर विकासकामे.
ग्रामपंचायत खरीड हद्दीत खालील प्रमुख धार्मिक स्थळे आहेत —
• श्री रिद्धिनाथ बाबा मंदिर
• भवानी माता मंदिर
• दत्त मंदिर
गावात पुढील सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात —
• छत्रपती शिवाजी महाराज जयंती
• श्री रिद्धिनाथ बाबा जयंती
• होळी
• दिवाळी
• रंगपंचमी
वन धन केंद्र खरीड कार्यरत असून स्थानिकांना रोजगार व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यात मदत होते.
ग्रामपंचायत खरीडमार्फत खालील सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात —
• जन्म प्रमाणपत्र
• मृत्यू प्रमाणपत्र
• विवाह प्रमाणपत्र दाखला
• दारिद्र्य रेषेचा दाखला (निःशुल्क)
• हयातीचा दाखला (निःशुल्क)
• ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला
• नमुना नं. ८ उतारा (मालमत्ता कर नोंद)
• जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र
• समाजकल्याण, कृषि, महिला व बालकल्याण, शिक्षण, दिव्यांग योजनांचे अर्ज
• मनरेगा मजूर नोंदणी
• सामाजिक अर्थ सहाय्य योजना
• घरकुल अर्ज
• ऑनलाइन तक्रार फॉर्म
• नागरिक फीडबॅक सेवा
शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
ग्रामपंचायत खरीडचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
Shahapur Panchayat Samiti